IMD Weather Forecast : यंदा मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु त्याबद्दलचं चित्र अजून तरी पूर्णत: स्पष्ट नाही. यंदा दीर्घकालिन सरासरीच्या 94 टक्के पाऊस होईल, तसेच महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील, असे स्कायमेटने म्हटले होते.
तर देशात मॉन्सून सर्वसाधारण (नॉर्मल) राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला. यंदा सरासरीच्या तुलनेत 96 टक्के पाऊस पडेल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.