Kadba Kutti Machine : शासनाकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेती करत असताना मशागतीची व इतर कामे सोयीस्कर व सोप्यापद्धतीने करता यावीत. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनामार्फत कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना महाराष्ट्र (Subsidy Scheme) राज्यासाठी सुरू करण्यात आली.
हे वाचा : शेतीला तार कुंपणासाठी मिळणार 90 टक्के अनुदान.
ज्या शेतकऱ्यांकडे गाय, म्हैस, शेळी अशी गोरे-ढोरे असतील, त्यांना जनावरांना चारा-पाणी व्यवस्थित करावा लागतो. जनावरांना चारा कापून घालताना शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागते. तुम्हीसुद्धा एक शेतकरी असाल व तुमच्याकडे गुर-ढोर असतील, तर चारापाणी करण्यासाठी शासनाकडून कडबा कुटी मशीन म्हणजेच Chaff Cutter Machine अनुदान तत्त्वावर दिली जाते.
Kadba Kutti Machine

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा
कडबा कुटी मशीनसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के 20 हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत अनुदान दिलं जातं, तर इतर शेतकऱ्यांना ही अनुदान मर्यादा 16 हजार रुपयापर्यंत आहे.