Kamgar Yojana : बांधकाम व्यवसायातील कामगारांसाठी शासनाने अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. त्यांचा सदुपयोग केल्यास कामगारांचे खरे ‘कल्याण’ होऊ शकते. पण, बिचाऱ्या कामगारांना या योजना काय आहेत, हेच माहीत नसल्याने या योजना कागदावरच राहतात की काय? असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आहे
हे वाचा : पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके.
- या योजनांचा प्रचार-प्रसार होणे जितके गरजेचे आहे, तितकेच कामगारांनीदेखील स्वतःहून पुढे येऊन या योजनांची माहिती करून घेणे आवश्यकच आहे.
- या योजनांविषयी असंघटित कामगारांच्या प्रश्नांचे निराकरण होणे गरजेचे आहे. कामगारांनी कामगार कल्याण मंडळाकडे नोंद करणे आवश्यक आहे.
- यानंतर विविध योजनांचा लाभ मिळू शकतो. बांधकाम व्यावसायिकांनी या कामगारांसाठी असलेल्या योजनांविषयी पुढाकार घेणेही आवश्यक आहे.
Kamgar Yojana

योजना कोणत्या आहेत व त्याचे लाभ काय आहेत ?
इथे पहा योजना
बांधकाम कामगार कोणास म्हणावे ?
- बांधकाम कामगारांत सेंट्रिग कामगार, गवंडी कामगार, फिटिंग (फरशी, इलेक्ट्रिकल), पेंटिंग कामगार, फर्निचर तयार करणारे सुतार कामगार, फॅब्रिकेटर्स, वीट कामगार, बिगारी कामगारांसह सुमारे 21 प्रकारच्या कामगारांचा समावेश आहे.
बांधकाम कामगार