Kanda Chal Anudan : कांदा चाळीसाठी सरकार देणार दिड लाख रु अनुदान.

Kanda Chal Anudan : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारण्यासाठी एक लाख 60 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

हे वाचा : मल्चिंग पेपरसाठी मिळतंय 50% अनुदान, असा करा अर्ज.

रांगडा कांद्याची साठवणूक क्षमता चांगली असल्याने तो सुकवून साठविला जाऊ शकतो. मात्र कांदा साठविण्यासाठी अद्यायावत गोदाम उपलब्ध नसल्याने खरीप हंगामातील कांदा काढला की लगेच विकावा लागतो. स्थानिक बाजारपेठेची व निर्यातीची मागणी भागविण्यासाठी कांद्याची साठवणूक क्षमता वाढविणे आवश्यक आहे.

Kanda Chal Anudan

मनरेगा अंतर्गत मिळणार अनुदान
इथे पहा अनुदान वाटप

  • कांदा हे जीवंत पीक असून त्याचे मंदपणे श्वसन चालू असते. तसेच त्यामधील पाण्याचे उत्सर्जनही होत असते. त्यामुळे कांद्याची योग्य पध्दतीने साठवणूक न केल्यास 40 ते 45 टक्क्यांपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते.
  • वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे अशा प्रमुख कारणांमुळे कांद्याचे नुकसान होते. असे नुकसान टाळण्यासाठी कांद्याची शास्त्रोक्त पध्दतीने साठवणूक करणे गरजेचे आहे.

Leave a Comment