Kapas Rate : दर वाढल्याशिवाय कापसाची विक्री नाही, आजचे दर.

Kapas Rate : कापसाचा हंगाम संपत आला असून, कापसाला योग्य दर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे. कापसाचे दर वाढल्याशिवाय कापूस विक्री (Cotton Sales) करणार नाही, असे शेतकऱ्यांचे मत आहेत. बँक थकीत राहिली तरी चालेल, कापसाला किमान 12 ते 13 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा, अशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

हे वाचा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान आले ?

यावर्षी कापसाला चांगलाच दर मिळणार असल्याची चर्चा असल्याने निंबा फाटा व नया अंदुरा परिसरात कपाशीची जास्तीत जास्त लागवड केली आहे. शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असताना लाल्या रोगाने आक्रमण केल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकरी संकटात सापडले होते. या सर्व संकटांवर मात करीत शेतकऱ्यांनी कापूस पिकविला. मात्र, कापसाची मातीमोल दराने विक्री करावी लागत असल्याने शेतकरी हतबल आहेत.

Kapas Rate Today

आजचे कापूस बाजारभाव

Leave a Comment