प्रोत्साहन लाभ योजनेची (Karj Mafi Yojana) पहिली यादी जाहीर होऊन महिना उलटला, मात्र शासनाने अद्याप दुसरी यादी जाहीर केलेली नाही. प्रोत्साहन लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील जवळ पास 23 हजार 590 शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केला आहे. यातील 12 हजार 942 शेतकऱ्यांचा पहिल्या यादीत समावेश आहे. अद्याप 10 हजार 748 शेतकऱ्यांची नावे आलेली नाहीत. दुसऱ्या यादीत त्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
Karj Mafi Yojana
रत्नागिरी जिल्ह्यात याची पहिली यादी शासनाने जाहीर केली होती. त्यात जिल्ह्यातील 12 हजार 942 शेतकऱ्यांचा समावेश होता. पहिल्याच दिवशी 9 हजाराच्या वर शेतकऱ्यांच्या खात्यात ही प्रोत्साहन रक्कम जमा झाली होती. नोव्हेंबर अखेरपर्यंत 12 हजार 880 शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे. एकूण 31 कोटी 83 लाख रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. मात्र शिल्लक राहिलेल्या 62 शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही (loan waiver scheme).