KCC Loan Online Apply

KCC Loan Online Apply (कर्ज किती मिळणार ?)

  • पशु किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत म्हशीसाठी 60 हजार, गायीसाठी 40 हजार, बकरी आणि मेंढ्यांसाठी 4 हजार आणि एक कोंबडीमागे 720 रुपये कर्ज दिले जाते. बॅंक किंवा वित्तसंस्था पशु किसान क्रेडिट कार्डधारकांना फक्त 4 टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देत आहे. पशुपालकांना 6 समान हप्त्यांमध्ये कर्जाचं वितरण केलं जातं. त्यांना त्याची 6 वर्ष कालावधीत परतफेड करावी लागेल. साधारणत: बॅंका शेतकऱ्यांना 7 टक्क्यांनी व्याज दराने कर्ज देत असते. मात्र, पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेत शेतकऱ्यांना 3 टक्क्यांची सूट दिली जाते.

KCC Loan Online Apply

अर्ज कुठे करायचा ?
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना नजीकच्या बॅंकेत जाऊन अर्ज करावा लागेल. अर्जासोबत केवाईसी म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, जनावरांचे आरोग्य प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक, जमिनीची कागदपत्रे व पासपोर्ट आकाराचा फोटो द्यावा लागेल. तसेच अर्जदार या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. त्यासाठी अर्जदाराला जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर कागद तपासणी पूर्ण झाल्यास पात्र पशुपालकांना 15 दिवसांमध्ये किसान क्रेडिट कार्ड दिले जाते.