शेतीला दिवसा पाणी देता यावं, यासाठी केंद्र शासनानं प्रधानमंत्री कुसुम सोलार योजना (Kusum Solar Yojana) सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना 3HP , 5HP आणि 7.5HP क्षमतेचे सौर पंप दिले जातात. पात्र अर्जदार शेतकरी सर्वसाधारण प्रवर्गातील असेल तर त्याला 90 % एवढं अनुदान दिलं जातं आणि अर्जदार अनुसुचित जाती-जमाती प्रवर्गातील असेल तर त्याला 95 % अनुदान दिलं जातं.
अनुदान कसं दिलं जातं ?
3HP पंपासाठी :
- एकूण किंमत : 1,93,803 रुपये.
- सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा : 19,380 रुपये.
- SC / ST प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा : 9,690 रुपये.
- अडीच एकरपर्यंत जमीन धारकास 3HP पंप
5HP पंपासाठी :
- एकूण किंमत : 2,69,746 रुपये.
- सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा : 26,975 रुपये.
- SC / ST प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा : 13,488 रुपये.
- अडीच ते 5 एकरपर्यंत जमीन धारकास 5HP पंप
7.5HP पंपासाठी :
- एकूण किंमत : 3,74,402 रुपये.
- सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा : 37,440 रुपये.
- SC / ST प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा : 18,720 रुपये.
- 5 एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास 7.5HP पंप

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Kusum Solar Yojana
पात्रता (Kusum Solar Yojana)
- पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.
- शेततळे, विहीर, बोअरवेल, नदी/ नाले याच्या शेजारील शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
- अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप अंतर्गत लाभ न मिळालेले शेतकरी.
कागदपत्रे (Kusum Yojana Documents)
- सातबारा उतारा, त्यावर विहिरीची किंवा बोअरची नोंद आवश्यक.
- आधार कार्ड.
- जातीचा दाखला.
- बँक पासबुक फोटो.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- सामायिक विहिरी असेल तर 200 रुपयांच्या बाँडवर इतर भोगवटादारांचं ना हरकत प्रमाणपत्र.



अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्या जिल्ह्यासाठी कोटा उपलब्ध ?
कोटा उपलब्ध असलेले हे जिल्हे : अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, लातूर, नागपूर, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ.
कोटा उपलब्ध नसलेले जिल्हे : अहमदनगर, औरंगाबाद, बुलढाणा, बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, मुंबई, मुंबई उपनगर,नांदेड, नंदूरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर.
मला अर्जंट गरज आहे पीक वाढत आहे मला अर्जंट मिळावे
पीक वाळत आहे मला अर्जंट मिळावे गरज आहे.
I am from Nasik district, what about our quota?
मी नासिक जिल्याहाचा आहे आमच्या कोट्याचे काय?
सध्या कोटा उपलब्ध नाही.
Sinnar tal. Dist nashik …whenever Quota available for us ?
नाशिक साठी सध्या कोटा उपलब्ध नाही.