Kusum Yojana : देशभरात प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा महाअभियान अर्थात “कुसुम योजना” राबविल्या जात आहेत. या अभियानाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यातून एक लाख विहिरींना सौरऊर्जेच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. या योजनेअंतर्गत एक लाख सौरऊर्जा कृषिपंप शेतकऱ्यानं मिळणार आहे.
हे वाचा : अवघ्या 1 रुपयात लाखो रुपयांच्या योजनांचा लाभ.
यात 30 टक्के वाटा केंद्र सरकार देणार आहे. पाच ते दहा टक्के वाटा शेतकऱ्यानं भरायचा आहे. इतर निधी राज्य सरकार देणार आहे. या योजनेत एससी, एसटी यांना 95 टक्के अनुदान असणार आहे. शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान राहणार आहे. ज्या ठिकाणी वीजवाहिनी पोहोचली नाही अशाच ठिकाणी ‘कुसुम’मधून सौरऊर्जा कृषिपंप जोडण्याच्या सूचना आहेत.
Kusum Yojana
कोणाला लाभ घेता येतो ?
अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर सर्व घटकांना या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे.
