Land Record : जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास त्या जमिनीचा (mahabhulekh) इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते.
हे वाचा : अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतून बेरोजगार तरुणांना मिळणार कर्ज.
ही माहिती फेरफार, सातबारा, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे. आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. याआधी ही सुविधा फक्त 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. आता मात्र राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा सुरु केली आहे.
Land Record

जुने फेरफार पाहण्यासाठी
इथे क्लिक करा
यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.
ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे. पण, हे उतारे कसे पाहायचे याचीच माहिती पाहण्यासाठी इथे क्लीक करा.