Land Record Map :
- जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी mahabhunakasha.mahabhumi.gov.in या वेबसाईट जा.
- या पेजवर search by plot number या नावानं एक रकाना दिलेला आहे.
- इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होतो.
- होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग वजाबाकीचं (-) बटण दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता.
- आता डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.
- एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथं दिलेली असते.
- ही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी map report नावाचा पर्याय असतो.
- यावर क्लिक केलं की, तुमच्या जमिनीचा plot report तुमच्यासमोर ओपन होतो. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या (Land Record Map) बाणावर क्लिक केलं तो तुम्ही डाऊनलोड करू शकता.
