Land Registration ID In Maharashtra

Land Registration : कसा शोधावा किंवा कोणत्या ठिकाणी असतो ? तर, हा नंबर शोधण्यासाठी तुम्ही राज्याच्या सातबाराच्या वेबसाईटवरती जाऊन अगोदर तुम्हाला तुमचं सातबारा काढावा लागेल आणि त्यावरती हा नंबर पाहायला मिळणार आहे.

7/12 वर Land Registration id सातबाऱ्यावर कसा शोधावा या ठिकाणी त्याबद्दल माहिती.

  • सर्वप्रथम भुलेख महाभूमीच्या ऑनलाइन पोर्टलवर जा – https://bhulekh.mahabhumi.gov.in/
  • दिलेल्या विभागांमधून तुमचा विभाग निवडा :- पुणे, कोकण, अमरावती, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर.
  • नंतर 7/12 निवडा जर तुम्ही 7/12 निवडले असेल तर आवश्यक असलेल्या जमिनीच्या नोंदीसाठी जिल्हा, गाव आणि तालुका निवडा.
  • त्यानंतर एकतर नाव, रेकॉर्डमधील नाव, सर्व्हे नंबर इ., आडनाव आणि पूर्ण नाव किंवा वर्णमालानुसार सर्वेक्षण क्रमांक / गट क्रमांक टाकावा.
  • खाली तुमचा मोबाईल नंबर भरा ”7/12 पहा शोधा” वर क्लिक करा आवश्यक तपशीलांसह ७/१२ स्क्रीनवर दिसेल.

महाभुमिअभिलेखच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन 7/12 डाऊनलोड केल्यानंतर आपल्या सातबाऱ्यावरील विशिष्ट असा क्रमांक म्हणजेच ULPIN क्रमांक सहजरीत्या मिळवू शकतो.

सातबारा संदर्भातील विविध कामे जशाप्रकारे सातबारा डाऊनलोड करणे नकाशा प्रॉपर्टी कार्ड व इतर शेतजमिनी संदर्भातील संपूर्ण कामे या विशिष्ट क्रमांकावर तीच अवलंबून असणार आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती लक्षात न ठेवता फक्त त्यांच्या शेतजमिनीचा लँड रजिस्ट्रेशन नंबर लक्षात ठेवून जमिनीशी संबंधित संपूर्ण कागदपत्रे एका मिनिटांमध्ये पाहत येणार आहेत.