Life Certificate : पेन्शन अखंडित चालू ठेवण्यासाठी पूर्वी प्रत्येक नोव्हेंबर महिन्यात पी. एफ. कार्यालयात जाऊन जीवित प्रमाणपत्र सादर करावे लागत होते. प्रमाणपत्र उशिरा सादर केल्यास पेन्शन बंद होत असे. त्यामुळे वयोवृद्ध पेन्शनधारकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असे. त्यामुळे पीएफ प्रशासनाने आता घरबसल्या मोबाइल अँप्सवर हयातीचा दाखला काढून ई-जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
हे वाचा : शेतीची कागदपत्रं काढा आता एका क्लिकवर.
त्यामुळे पी. एफ. कार्यालयात जाण्याची गरज राहिलेली नाही. पेन्शन अखंडित सुरू राहण्यासाठी पेन्शनधारकांना दरवर्षी हयातीचा दाखला द्यावा लागतो. अन्यथा पेन्शन बंद करण्यात येते. पूर्वी पेन्शनधारकांना हयातीचा दाखला कार्यालयात अथवा बँकेत जमा करावा लागत होता. आताही वर्षातून एक वेळा ई-जीवन प्रमाणपत्र जमा करावे लागणार आहे.
Life Certificate

कोणती माहिती आवश्यक ?
ॲपवर मिळवा दाखला
- आता घरबसल्या उमंग अँप्सद्वारे किवा मोबाइलच्या गुगल पे स्टोअरच्या आधारे फेस रिडर अँप्सद्वारे हयातीचा दाखला काढता येणार आहे. त्यामुळे पीएफ कार्यालयात अथवा बँकेत दाखला काढण्यासाठी जाण्याची आवश्यकता नाही.