Livestock Insurance Scheme : पशुधन कवच विमा योजनेंतर्गत देशी व संकरित गायी, म्हशी, बैल, रेडे, शेळ्या, मेंढ्या, या प्राण्यांचा विमा काढता येणार आहे. त्यामुळे अकाली मृत्यू पावणाऱ्या या पशुधनाला विमा सुरक्षेचे कवच मिळणार आहे. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त प्रति लाभार्थी प्रति परिवार 5 गायी, म्हशी या जनावरांचा अथवा 50 शेळ्या, मेंढ्या, यांचा विमा काढता येणार आहे.
हे वाचा : नाफेडचे टार्गेट पूर्ण, हरभऱ्याची खरेदी थांबली.!
शासनाच्या या योजनेंतर्गत पशुपालकांना याचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम पशुधन मालकांना त्यांच्या जनावरांचा विमा काढावा लागेल. या अंतर्गत गाय, म्हैस, शेळी, मेंढी, आदींचा विमा काढता येतो. विमा काढल्यानंतर जनावराचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी पशुधन मालकांना विम्याची रक्कम देईल. जनावराच्या मृत्यूनंतर 15 दिवसांच्या आत नुकसानभरपाईची रक्कम दिली जाते.
Livestock Insurance Scheme

कोणत्या जनावरासाठी किती विमा
विमा किती भरावा लागणार ?
एससी व एसटी संवर्गातील पशुपालकांसाठी पशु विमा पूर्णपणे विनामूल्य आहे. इतर वर्गांना प्रति वर्ष 100 ते 300 रुपये प्रति पशुपालन विमा काढावा लागतो. विम्याच्या प्रीमियमची रक्कम जनावराच्या दुधाच्या उत्पन्नावर आधारित असते.