MahaDBT Scheme : शेतकऱ्यांना दिलासा देत कृषी विभागाकडून 25 एप्रिल 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना मागील ती योजना मिळणार आहे. हा शासनाचा उपक्रम मागेल त्याला योजना या नावाने ओळखला जाणार असून यामध्ये शेततळे, फळबाग, प्लास्टिक अस्तरीकरण, कॉटन श्रेडर, बीबीएफ पेरणी यंत्र, ठिबक, तुषार आशय अनेक योजनांचा समावेश असणार आहे.
हे वाचा : आरटीई प्रवेशाची तारीख वाढली, पालकांना दिलासा.
राज्यातील शेतकऱ्यांना शेती करत असताना विविध नैराश्यातून सामोरे जावे लागते, त्यासाठी त्यांना आर्थिक (Financial) मदत व विविध घटकांचे वाटप महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अनुदान तत्त्वावर शासनाकडून करण्यात येते. त्या अनुषंगाने आता मागील त्याला शेततळे, फळबाग, प्लास्टिक अस्तरीकरण, कॉटन श्रेडर, बीबीएफ पेरणी यंत्र, ठिबक, तुषार हे घटक उपलब्ध करून देण्याचे प्रस्थापित आहे. या विविध योजनांकरता चालू वर्ष 2023-24 साठी 1 हजार कोटी रूपये नियतव्यय प्रस्तावित आहेत.
MahaDBT Scheme

शासन निर्णय पाहण्यासाठी
इथे क्लिक करा
शासन परिपत्रक
शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेला घटक मागणी केल्यानंतर तातडीने उपलब्ध व्हावा, यासाठीचा शासन परिपत्रक सुरू करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना सदर घटक/बाब कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रचलित योजनाअंतर्गत व त्यांच्या ठरविण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार उपलब्ध करून देण्यात येतील, त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
👇 👇 👇 👇

Farm ring
नगर परिषद हद्दीतील शेतकऱ्यांना लाभ घेता येतो का प्लिज विनंती कळवा सर
नगर परिषद हद्दीतील शेतकऱ्यांना लाभ मिळतो