State Board : 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक बातमी.

State Board : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा कॉफीमुक्त करण्यासाठी, बोर्डाने फेब्रुवारी-मार्च 2023 पासून परीक्षा सुरू होण्याच्या आधी 10 मिनिटे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्याची परवानगी देण्याची सवलत रद्द करण्यात आली आहे.

हे वाचा : बारावीचे हॉल तिकीट आले..! असे करा डाउनलोड.

सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून पेपरफुटी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आज मंत्रालयात मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला शिक्षण आयुक्त, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव, विभागीय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय अधिकारी आदी उपस्थित होते.

State Board Exam

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचे नियम या वर्षी कठीण करण्यात आलेले आहेत.
  • फेब्रुवारी-मार्च 2023 महिन्यातील दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी यंदा पहिल्या सत्रातील पेपरसाठी 10:30 नंतर आणि दुपारच्या सत्रातील पेपरसाठी 2:30 वाजल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा कक्षात जात येणार नाही.
  • तसेच शाळा तिथे परीक्षा केंद्र, अभ्यासक्रम कपात, वाढीव वेळ अशा अनेक सुविधा रद्द केल्या आहेत. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणारी 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा कडकच होणार आहे. असे यामधून स्पष्ट दिसून येत आहे.

Leave a Comment