Maharashtra State Board : 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

Maharashtra State Board : दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या निर्धारित वेळेच्या दहा मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्याची पद्धत बंद केली.

हे वाचा : राज्यात 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती.

मात्र, परीक्षेच्या वेळेत दहा मिनिटांनी वाढ करण्याचा निर्णय बुधवारी मंडळाने घेतला. पालक, विद्यार्थ्यांनी केलेली मागणी आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत, हा निर्णय घेतला असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हटले आहे.

Maharashtra State Board

  • परीक्षा सुरू असताना मोबाइल, तसेच समाजमाध्यमांवर प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याचे काही प्रकार निदर्शनास आले होते.
  • त्या पार्श्वभूमीवर पेपरफुटींच्या अफवांना प्रतिबंध घालणे, तसेच भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीतपणे पार पडाव्यात, यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय १० फेब्रुवारी रोजी घेतला होता.
  • विद्यार्थी आणि पालकांमध्ये या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर दिसत होता. त्यामुळे मंडळाने पुन्हा प्रसिद्धीपत्रक काढले आणि परीक्षेच्या एकूण वेळेत दहा मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घेतला.
State Board Exam

Leave a Comment