Marriage Certificate Online : लग्न केले, विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेतले का ?

Marriage Certificate Online : लग्न केल्यानंतर विवाह प्रमाणपत्र हे वधू आणि वराच्या वैवाहिक बंधनाचे कायदेशीर प्रमाणपत्र देणारा दस्तवेज आहे. बहुतांशी सरकारी कामकाजात या प्रमाणपत्राची गरज भासते. मात्र, बहुतांशी जोडपे लग्न केल्यानंतर महापालिका, नगरपरिषद अथवा ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करुन विवाह प्रमाणपत्र घेत नाहीत नंतर काही कामास्तव गरज भासल्यानंतर प्रमाणपत्र मिळविण्यासठी धावपळ केली जाते.

हे वाचा : आज पासून होणार महत्त्वाचे 11 बदल, पहा काय आहेत नवीन नियम.

विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांत हे प्रमाणपत्र अर्जदारांना दिले जाते. यासाठी वधू व वराचा शाळा सोडल्याचा दाखला व रेशनकार्ड, वधू व वराचा लग्नाचा फोटो व लग्नपत्रिका, 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र, 110 रुपयांची स्टॅम्प तिकिटे, तीन साक्षीदार व पुरोहिताच्या रेशनकार्डाची झेरॉक्स, घरपट्टी किंवा नगरसेवकाचे ओळखपत्र ही कागदपत्रे लागतात.

Marriage Certificate Online

विवाह नोंदणी कशी कराची ?

विवाह नोंदणी प्रमाणपत्र कशासाठी आवश्यक ?

विवाह नोंदणी प्रमाणपत्राला कायदेशीर अधिकृत कागदपत्र म्हणून मान्यता आहे.

  • यामुळे बालविवाहांवर आळा घालता येतो.
  • हे प्रमाणपत्र विधवांना वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते, द्विपत्नी व बहुपत्नीत्व विरुद्ध कायदेशीर हक्क लढता येतो
  • विभक्त कुटुंबात स्त्रियांना मुलाचं कायदेशीर ताबा मिळण्याकरिता लढता येते.
  • तसेच पासपोर्ट, बँकांचे कर्जप्रकरण, विम्यासाठी दावा आदी कामांसंदर्भात हे प्रमाणपत्र गरजेचे ठरते.

Leave a Comment