Masked Aadhaar Card : मास्कड आधार वापरा, फसवणूक टाळा !

Masked Aadhaar Card : अलीकडे बँक, शाळा, नोकरीचे ठिकाण किंवा कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्याकरिता आधार, पॅनकार्ड बंधनकारक असते. या प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची (Aadhaar Card) झेरॉक्स द्यावी लागते. मात्र, या झेरॉक्सवरील आधार क्रमांकाचा कधी-कधी गैरवापर होऊन व्यक्तीची फसवणूकदेखील होऊ शकते.

हे वाचा : एस. टी. मध्ये सर्व महिलांना आता अर्धे तिकीट.

हे टाळण्यासाठी मास्क आधारचा पर्याय उपलब्ध आहे. मास्क आधार कार्डवर बारा पैकी पहिल्या 8 अंकांवर स्टार दिसतात, तर केवळ अखेरचे 4 अंक वाचता येतात. त्यामुळे त्याचा गैरप्रकार टाळता येऊ शकतो.

Masked Aadhaar Card

इथे क्लिक करून
मास्कड आधार डाऊनलोड करा

फसवणूक टाळण्यासाठी उपयोगी
  • तुमचा मूळ आधार क्रमांक लपवलेला आहे आणि मुखवटा घातलेल्या आधारमध्ये कोणीही त्याचा गैरवापर करू शकत नाही.
  • परंतु, सामान्य आधार कार्डाच्या बाबतीत तुमचा संपूर्ण आधार क्रमांक दिसतो जो इतरांना वापरता येईल.
  • मास्क केलेले आधार आवश्यकतेनुसार डाउनलोड केले जाऊ शकते.
  • तर सामान्य आधार कार्ड आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन मिळवता येते.

इथे क्लिक करून
मास्कड आधार डाऊनलोड करा

Leave a Comment