Monsoon Weather : सलग चार वर्षे चांगला मान्सून (Mansoon) दिल्यानंतर ‘ला-नीना’ (la nino) निरोप घेत यंदा अल निनोचा प्रभाव असणार आहे. यामुळे भारतातील मान्सूनला आता अल निनोचा धोका असल्याचे म्हटले जात आहे. अल निनोमुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. यंदा मे ते जुलैदरम्यान ‘अल-नीनो’ची स्थिती राहू शकते. तसेच जून ते ऑगस्ट दरम्यान अल निनो सक्रिय असू शकते, अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली आहे.
हे वाचा : कापसासाठी 70 हजार, तर सोयाबीनसाठी घ्या हेक्टरी 59 हजारांपर्यंत पीक कर्ज मर्यादा.
देशात यापूर्वी 2018 मध्ये अल नीनो (El Nino) चा प्रभाव दिसला होता. त्यानंतर 2019, 2020, 2021 आणि 2022 अशी सलग चार वर्षे चांगला पाऊस झाला. 2001 ते 2020 या कालावधीत भारताने सात वेळा अल निनोचा प्रभाव पाहिला आहे. अल निनोमुळे 2003, 2005, 2009-10, 2015-16 यामध्ये अनुक्रमे 16 टक्के, 8 टक्के, 10 टक्के आणि 3 टक्के खरीप किंवा रब्बीच्या उत्पादनात घट झाली होती.
Monsoon Weather

काय आहे हवामान अंदाज
इथे पहा
केंद्रीय पातळीवर बैठका
- देशात अल निनोचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने प्रयत्न सुरु केले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालय आणि आयएमडीकडून योजना तयार केली जात आहे. त्यासाठी मासिक बैठकाही होत आहेत. यंदा IMD भारतातील 700 जिल्ह्यांना कृषी-हवामानविषयक सल्लागार सेवा आणि अंदाज देणार आहे.