Rabi Crop MSP : रब्बी हंगामातील पिकांसाठी केंद्र शासनकडून हमीभाव जाहीर करण्यात आले आहेत. गहू, हरभरा आणि मसूर या पिकांच्या हमीभावात वाढ झाली आहे. सर्वात जस्ता वाढ मसूरच्या हमीभावात करण्यात आली आहे.
हे वाचा : फळबाग लागवडीसाठी घ्या सरकारी योजनेचा लाभ.
दरर्षीच्या तुलनेत हरभऱ्याच्या प्रतिक्विंटल 105 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यावर्षी हरभऱ्याच्या 5,335 रुपये दर मिळणार आहे. मात्र, वाढलेला उत्पादन खर्च पाहत शेतकऱ्यांना किमान 6,000 रुपये दर मिळणे अपेक्षित होता. तर, गव्हाच्या हमीभावात 110 रुपयांनी वाढ तर मसूरच्या हमीभावात 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Rabi Crop MSP
केंद्र शासन कडून दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील पिकांना योग्य दर मिळावा म्हणून हमीभाव जाहीर केले जातात. हे हमीभाव ठरविण्यासाठी राज्य व केंद्र पातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती शेतकऱ्यांना येणारा उत्पादन खर्च लक्षात घेऊन हमीभाव ठरवत असते.
यावर्षी समितीने दिलेल्या आहवालानुसार हमीभावाचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी हरभरा पिकाला प्रतिक्विंटल 5,230 रुपये हमीभाव होता, यावर्षी यात 105 रुपयांची वाढ होऊन 5,335 रुपये दर करण्यात आला आहे. गव्हाला गेल्या वर्षी 2015 रुपये हमीभाव होता, यावर्षी 110 रुपये वाढविण्यात आले यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 2,125 रुपये मिळणार आहेत.
पिकाचे नांव : | दार वाढ | हमीभाव |
करडई | 209 | 5,650 |
मोहरी | 400 | 5,450 |
ज्वारी | 100 | 1,735 |
सर्वात जास्त वाढ मसूरच्या हमीभावात
सर्वाधिक 500 रुपये वाढ करण्यात आली आहे. यावर्षी प्रतिक्विंटल 6,000 रुपयेप्रमाणे हमीभाव मिळणार आहे.