MSRTC : एस. टी. मध्ये सर्व महिलांना आता अर्धे तिकीट.

MSRTC : एसटी महामंडळाच्या बसमध्ये आतापर्यंत ज्येष्ठ महिलांनाच बस प्रवासात सवलत होती. मात्र, राज्य शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात एसटी प्रवासात सर्व महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचा : माझी कन्या भाग्यश्री योजने बदल संपूर्ण माहिती.

शासनाच्या या निर्णयाचे महिला वर्गामधून स्वागत होत असून, शासनाने बसमध्ये महिला-भगिनींनाही प्रवासात ५० टक्के सवलत देण्याबाबत घेतलेला निर्णय खूप चांगला आहे. जेव्हा शासनाकडून याबाबत परिपत्रक येईल, तेव्हा महिलांना बसमध्ये सवलत देण्यात येईल.

MSRTC

हे वाचा : Smart Card एसटीचे स्मार्ट कार्ड कधी मिळणार ?

सर्वच महिलांना अर्धे तिकीट

एसटी महामंडळाच्या बस प्रवासात शासनाने ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वच महिलांना अर्धे तिकीट काढून प्रवास करता येणार आहे.

12 thoughts on “MSRTC : एस. टी. मध्ये सर्व महिलांना आता अर्धे तिकीट.”

  1. अप्रतिम निर्णय..
    माझी लालपरी..
    जगात भारीच..
    सुरक्षित प्रवास..
    खर्चात बचत..
    सर्व महिलावर्ग आनंद व्यक्त करीत आहोत…
    मेढा बस स्थानक.
    मेढा आगार.
    नियमित प्रवासी…
    सौ जयश्रीताई माजगावकर
    अंगणवाडी सेविका…
    फक्त
    निर्णय अंमलात लवकर यावा…
    शासन निर्णय बद्दल
    मनापासून आभार….

    Reply
  2. शिंदे सरकारला धन्यवाद फार चांगली योजना महिलांसाठी लवकरात लवकर अंमल बजावणी करावी
    ही विनंती पुनश्च धन्यवाद 👌🚩🙏

    Reply
  3. शिंदे सरकारचं अभिनंदन महिलांसाठी खूप चांगली योजना आणल्याबद्द

    Reply
    • तिकीट half करण्यापेक्षा, सिलेंडर चे भाव अर्धे करा……

      Reply
  4. खरच अतिशय उत्कृष्ट असा निर्णय राज्य सरकारण घेतला आहे.
    अभिनंदन

    Reply
  5. .. अतिशय उत्कृष्ट निर्णय घेण्यात आल्याने श्रीयुत मुख्यमंत्रीसाहेब एकनाथ शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन…
    सुधीर धोरलेकर… डोंबिवली

    Reply
  6. मा. श्री.मुख्यमंत्री साहेब आपणास खूप खूप धन्यवाद. असे धाडसी निर्णय घेण्याची क्षमता असलेला प्रामाणिक माणूस आपल्या महाराष्ट्राला प्रथमच भेटला.

    Reply
  7. महिलांच्या हिताबद्दलचा निर्णय फारच छान शिंदे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे सरकारला खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र

    Reply
  8. शिंदे फडणवीस सरकार ! दमदार सरकार ! सर्वच निर्णय अतिशय वेगवान आणि गरिबांच्या हिताचे ! धन्यवाद शिंदे साहेब ! धन्यवाद फडणवीस साहेब ! धन्यवाद युती सरकार !

    Reply
  9. मा. मुख्यमंत्री साहेब, सर्व महिलांसाठी एस.टी. बस तिकीट मध्ये पन्नास टक्के सवलत. खूपच छान निर्णय. या बद्दल आपले आभार. असाच निर्णय साठ वर्षे पुढील पुरुष (सिनिअर सिटिझन) बाबतही घ्याल ही अपेक्षा. धन्यवाद

    Reply

Leave a Comment