Mukhyamantri Solar Pump : मुख्यमंत्री सौर कृषी पंप नव्याने सुरु, GR आला.

Mukhyamantri Solar Pump : राज्यातील कृषीपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानांर्तगत केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान (Kusum) देशभरात राबविण्यात येत आहे.

या अभियानाची अंमलबजावणी केंद्र शासनाने दिनांक २२ जुलै, २०१९ अन्वये प्रसिध्द केलेल्या व वेळोवेळी दिलेल्या महाभियानाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार करण्यास व त्याची उद्दिष्टे, कार्यपध्दती, अंमलबजावणी, निधीची तरतूद, आर्थिक अनुदान तसेच राज्यात सदर अभियान स्टेट नोडल एजन्सी (महाराष्ट्र ऊर्जा विकास (Mahaurja Abhiyan) अभिकरण) मार्फत राबविण्यास दिनांक १२ मे, २०२१ च्या शासन निर्णयान्वये शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

GR (शासन निर्णय) पहा

Mukhyamantri Solar Pump 2023

सदर कुसुम महाभियानाच्या पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्याबाबतच्या घटक

(Componant B) अंतर्गत ऑगस्ट, २०२२ अखेर केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला एकूण २,००,००० पारेषण विरहीत सौर पंप मंजूर करण्यात आले आहेत. सदर २,००,००० पारेषण विरहीत सौर कृषी पंपापैकी (Solar Pump Yojana 2023) १,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपंपाची अंमलबजावणी महाऊर्जाद्वारे करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

आता उर्वरित केंद्र शासनाने नव्याने मंजूर केलेल्या १,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपंपाची अंमलबजावणी स्टेट नोडल एजन्सी (महाराष्ट्र ऊर्जा (Mahaurja Abhiyan) विकास अभिकरण) मार्फत महावितरण कंपनीकडून राज्यातील मागणी नोंदविलेल्या प्रलंबीत कृषि पंप विद्युत जोडण्यांच्या पुर्ततेसाठी (Paid Pending) करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

GR (शासन निर्णय) पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment