Mulching Paper Scheme : अर्ज कुठे करायचा

Mulching Paper Scheme (अर्ज कुठे करायचा)

  • मल्चींग साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्जासाठी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच योजनेविषयीच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.

Mulching Paper Scheme

कसे आहे अनुदान
  • सर्वसाधारण क्षेत्रसाठी प्रति हेक्टरी मल्चिंग पेपर वापरासाठी ३२ हजार रुपये खर्च येतो. या अभियानांतर्गत खर्चाच्या 50 टक्के जास्तीत-जास्त म्हणजेच 16 हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाते.
  • यामध्ये शेतकरी वैयक्तिक लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट, सहकारी संस्था यांना अर्थसहाय्य केले जाते.