Nafed Harbhara Kharedi : नाफेडचे टार्गेट पूर्ण, हरभऱ्याची खरेदी थांबली.!

Nafed Harbhara Kharedi : खासगी बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीमध्ये खरेदी करण्यात येणाऱ्या नाफेड केंद्राकडे धाव घेतली. ऑनलाइन नोंदणीला सुरुवात होताच कित्येक तास रांगेत राहून नोंदणी केली. खरेदी सुरूसुद्धा झाली, परंतु आता टार्गेट पूर्ण झाल्याने खरेदी बंद करण्यात आल्याचे ‘डीएमओंनी सांगितले.

हे वाचा : आता अँप्स सांगणार, तुमच्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस कधी पडणार

त्यामुळे ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांचा हरभरा घरातच पडून असल्याने ऐन खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बळीराजाच्या अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांनी भर उन्हात उभे राहत नोंदणी केली. 18 हजार 495 शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी पूर्ण केली. त्याचे तुलनेत 50 टक्क्यांपेक्षाही कमी शेतकऱ्यांची खरेदी झालेली असतानाच हरभरा खरेदी बंद झाली आहे.

Nafed Harbhara Kharedi

50 टक्केही शेतकऱ्यांकडून खरेदी नाही.!

  • यंदा शेतकऱ्यांनी हरभऱ्याला पसंती देत 1 लाख 21 हजार 177 हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. सरासरी उत्पादनही बऱ्यापैकी झाले. सुरुवातीपासूनच खासगी बाजारपेठेत हरभऱ्याचा भाव चार ते साडेचार हजारांवर स्थिरावला होता.
  • शासनाचा यंदाचा हमीभाव 5 हजार 335 रुपये प्रतिक्विंटल असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडकडे धाव घेतली. जिल्ह्याला 4 लाख 12 हजार 902 क्विंटलचे टार्गेट असून, खरेदी थांबली आहे. अचानक टार्गेट पूर्ण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Leave a Comment