Namo Shetkari Sanman Nidhi Yojana
नमो शेतकरी सन्मान निधी योजना: नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी या काळातील सर्वात मोठी बातमी येणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असाल तर आता तुम्हाला 6 हजार रुपयांऐवजी 12 हजार रुपये मिळतील. केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 100% अनुदानावर वर्षाला 6000 रुपये दिले जातील. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र शासनामार्फत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत वर्षाला ६ हजार रुपये दिले जाणार आहेत.
नक्की वाचा: नवीन GR आला आहे! कुटुंबातील सर्व सदस्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.
त्यामुळे आता शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून वर्षाला ६ हजार तर राज्य सरकारच्या माध्यमातून ६ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 12 हजार रुपये पाठवले जातील.
शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहेत.
शेतकरी मित्रांनो, ही रक्कम किसान बँकेत कशी जमा होणार? ज्याप्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, त्याचप्रमाणे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
नमो शेतकरी सन्मान निधी योजना
अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातून दिली आहे. या बातमीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून ही बातमी 100% खरी असल्याची महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. नमो शेतकरी सन्मान निधी योजना.