New 7/12 information
आता जमिनीच्या सातबारा उताऱ्यामध्ये (New 7/12 information) मोठा बदल करण्यात आले आहे. तुमच्या जमिनीला आधार क्रमांक मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून हा नवीन प्रकल्प राबवला जातोय या प्रकल्पाच्या माध्यमातून देशांमधील जमिनीच्या (land record information) प्रत्येक कोपऱ्याला प्रत्येक खंडाला एक UL PIN नंबर दिला जाणार आहे.
Land Record महाराष्ट्र मध्ये याच मोहिमेच्या अंतर्गत जमिनीला UL PIN नंबर म्हणजेच आधार क्रमांक देण्यात येणार आहे. आता हा UL PIN नंबर प्रिन्ट होऊन यायला सुरुवात देखील झालेली आहे.
UL PIN सातबारा चे फायदे
- विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी गट नंबर ऐवजी आता UL PIN चा वापर करत येईल.
- सर्व जमीन व्यवहारांमध्ये एक सूत्रता आणणे.
- जमीन व्यवहारांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालने.
- जेव्हा जेव्हा भूभागाचे क्षेत्र व हद्दी यात कोणत्याही कारणास्तव बदल होईल तेव्हा नवीन ULPIN निर्माण करण्यात येईल त्यास लेखनप्रमाद दुरुस्ती आदेश अपवाद असेल.