Nuksan Bharpai GR : सलग 5 दिवस पाऊस झाल्यास नुकसान भरपाई मिळणार.

Nuksan Bharpai GR : प्रतिदिन 65 मि. मी. याप्रमाणे सलग 5 दिवस पाऊस झाल्यास यामुळे होणाऱ्या शेतपिकांचे नुकसान देखील आता मदतीसाठी पात्र असेल. ‘सततचा पाऊस’ ही राज्य नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यास राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यातील नियमांचा अडसर दूर झाला आहे.

हे वाचा : कापूस दर वाढणार, सध्याची दरपातळी काय ?

यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यानंतर जशी मदत मिळते तशीच मदत सततच्या पावसामुळे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सततच्या पावसाची सध्या कोणतीही परिभाषा नसल्याने ती निश्चित करण्यासाठी कृषी विभागाची समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने पिकांच्या नुकसानीसाठी विहित दराने मदत देण्याबाबत सततच्या पावसासाठी काही निकष सुचविले होते. हा अहवाल मंत्रीमंडळ बैठकीत ठेऊन त्याला मान्यता देण्यात आली आहे.

Nuksan Bharpai GR

कुणाला मिळेल याचा लाभ ?

काय नुकसान होत ?
  • 24 तासात 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस (Rain) झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात.
  • नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्याकरिता विहित दराने अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.
  • मात्र, अतिवृष्टीची (Nuksan Bharpai News) नोंद नसतानाही काही दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होते.
  • अशा शेतकऱ्यांना शासनाकडून सध्या नुकसानीची मदत मिळत नाही.
  • शेती पिकांचे नुकसान झालेल्या योग्य शेतकऱ्यांना मदत मिळण्याकरिता शासनाकडे आलेल्या प्रस्तावाकरिता योग्य निकष निश्चित करण्यासाठी.

Leave a Comment