Onion Subsidy Apply : गेल्या महिन्यात कांद्याचे दर कोसळल्यानंतर राज्य सरकारने 350 रुपये प्रतिक्चिटल अनुदान जाहीर केले होते. त्यासाठी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 3 ते 20 एप्रिलदरम्यान अर्ज करायचे आहेत. 1 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान बाजार समिती, खासगी बाजार तसेच नाफेडकडे विक्री करणाऱ्या उत्पादकांना याचा लाभ मिळणार आहे.
हे वाचा : सातबारा, आठ अ उतारा काढा आता एका क्लिकवर.
कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार समित्या, थेट पणन परवानाधारक तसेच नाफेडकडे 1 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधी कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्चिटल ३५० रुपये आणि जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Onion Subsidy Apply

इथे करा अर्ज
आवश्यक कागदपत्रे
यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार परराज्यातून आवक झालेल्या व व्यापायांच्या कांद्यासाठी ही योजना लागू नाही. हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होणार असून, अनुदान मिळण्यासाठी कांदा विक्री पट्टी किंवा विक्री पावती, सातबारा उतारा, बँकेचे खाते क्रमांकासह बाजार समितीकडे अर्ज करावा लागणार आहे.