Onion Subsidy Maharashtra : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 300 रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी केली. कांद्याचे दर कोसळल्याने राज्यातील शेतकरी अनुदानाची मागणी करत होते. त्यावरून विरोधीपक्षाने कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी केली होती.
हे वाचा : मास्कड आधार वापरा, फसवणूक टाळा !
“कांदाचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने समिती नेमली होती. या समितीने 200 रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याची शिफारस केली होती. परंतू सरकारने कांद्याला 300 रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचे ठरवले आहे.”
Onion Subsidy Maharashtra
हे वाचा : शेतकऱ्यानं आता फक्त 1 रुपयांता मिळणारं पीक विमा.
पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ” 2017 मध्ये 100 रुपये प्रतिक्विंटल अनुदान दिले होते. 2018 मध्ये 200 रुपये अनुदान दिले होते. आम्ही मात्र 300 रुपये प्रतिक्विंटल अनुदान देत आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
“नाफेडची कांदा खरेदीही सुरू झालेली आहे. त्यातून शेतकऱ्यांना 10 रुपये 30 पैसे पर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे,” मुख्यमंत्री म्हणाले.