Orchard Plantation Scheme : महात्मा गांधी रोजगार हमी योजनाअंतर्गत लाभ घेता येऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत एकूण 16 बहुवार्षिक फळ पिकांचा समावेश आहे.
हे वाचा : अतिवृष्टी नुकसान भरपाई आता नवीन पद्धतीने जमा होणार.
यामध्ये शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार किंवा कृषी हवामान क्षेत्रास अनुकूल असलेल्या फळपिकांची लागवड करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी किमान 0.80 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत क्षेत्र असणे आवश्यक आहे.
Orchard Plantation Scheme
या फळपिकांचा लाभ घेता येणार
- आंबा हे फळपीक असेल तर 10 बाय 10 अंतर मीटरमध्ये 100 झाडांसाठी 65 हजार 84 रुपये अनुदान दिला जात.
- पेरू लागवड यांसाठी 6 बाय 6 आणि 3 बाय 2 या अंतर मीटरवर 277 आणि 1666 या झाडांसाठी अनुक्रमे 73 हजार 319 व 2 लाख 23 हजार 811 रुपये अनुक्रमे अनुदान दिला जात.
- डाळिंब लागवडसाठी 4 बाय 3 अंतर मीटरसाठी 740 झाडांकरिता 1 लाख 17 हजार 615 रुपये अनुदान दिला जात.
- सिताफळ लागवडसाठी 5 बाय 5 मीटर अंतरावरील 400 झाडांकरिता 86 हजार 762 रुपये अनुदान दिला जात.
- नारळ लागवडसाठी 8 बाय 8 मीटर अंतरावरील 150 झाडांकरिता 52 हजार 32 रुपये अनुदान दिला जात.
महाडीटीबी पोर्टल या संकेतस्थळावरून अर्ज करा
- मोसंबी, काजू, संत्रा, जांभूळ, चिंच, आवळा, चिकू इत्यादी फळपिकांसाठी सुद्धा अनुदान देण्यात येणार आहे.
- शासनाद्वारे रोपांची लागवड करणे, पिक संरक्षण व ठिबक द्वारे पाणी देणे यासाठी देखील अनुदान देण्यात येते.
इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या MAHADBT Portal या संकेतस्थळावरून अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.