Petrol And Diesel Price : सौदी अरबने अचानक तेल उत्पादनात मे महिन्यापासून दररोज 5 लाख बॅरल्स एवढी घट करण्याचा निर्णय जाहीर केला. सौदीसह ओपेक देश मिळून दररोज सुमारे 7 ते 8 लाख बॅरल्स उत्पादन घटविणार आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर एका दिवसातच 8 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा झटका बसू शकतो.
हे वाचा : शासनाची ही याेजना प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असायलाच हवी.
कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर घटण्याची शक्यता वाढली होती. मात्र, सौदी अरबच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.
Petrol And Diesel Price

भारतावर काय परिणाम होणार ?
सौदीने वर्ष 2022 मध्ये दररोज सरासरी 1.15 कोटी बॅरल्स एवढ्या कच्च्या तेलाचे उत्पादन केले होते. त्यातुलनेत ही कपात 5 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे सौदीने म्हटले आहे. यापूर्वी अमेरिकेतील मध्यावधीच्या तोंडावर 20 लाख बॅरल्स एवढी दैनंदिन कपात करण्यात आली होती.