Petrol Price : वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याज दरवाढीचा उपाय केला. मात्र, त्यानंतर लोकांवरील कर्जाचा बोजा वाढला आहे.
हे वाचा : 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.
जनतेला महागाईतून दिलासा देण्यासाठी आता केंद्र सरकार इंधनवरील (Today Diesel Rate) करांत कपात करण्याचा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. तशी शिफारस आरबीआयने केली आहे. मात्र, फेब्रुवारीचा महागाईचा डाटा जारी झाल्यानंतरच यासंबंधीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
Petrol Price
डिसेंबरमध्ये 5.72 टक्के असलेला किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर जानेवारीमध्ये वाढून 6.52 टक्के झाला आहे. घाऊक महागाईच्या दरात मात्र घट झाली. पेट्रोल आणि डिझेलचे (Diesel Rate) दर सध्या वाढलेलेच आहेत.

सध्याचे वातावरण पाहता दूध, मका आणि सोयाबीन तेल यांसह खाद्य क्षेत्रातील महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार मक्यावरील आयात कर कमी करण्याचा विचार करीत आहे. सध्या मक्याच्या आयातीवर तब्बल 60 टक्के आयात कर आहे.
पेट्रोलियम पदार्थ, गॅस येणार जीएसटीच्या कक्षेत
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलियम पदार्थ आणि गॅस यांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत सकारात्मक वक्तव्य केले आहे. राज्यांनी सहमती दिल्यास तसे होईल, असे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले.