Pik vima Yojana Update
आपल्या राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, नैसर्गिक आपत्ती आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा (Pik vima Yojana Update ) भरपाई रक्कम लवकरात लवकर देण्याची जबाबदारी संबंधित विमा कंपन्याची आहे.
वारंवार सूचना देऊनही कंपन्याकडून गतीने कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे विमा कंपन्या बाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. त्याची दखल घेऊन कंपन्याने शेतकऱ्यांची पिक विमा रक्कम तात्काळ अदा करावी. विनाकारण शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्या विरुद्ध कार्यवाही करण्यात येईल, असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे.
पिक विम्याचे पैसे तात्काळ मिळणार
विमा कंपन्याकडे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने विमा मिळवण्यासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपन्याने विचारात घेण्याच्या सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या त्याची कार्यवाही प्रलंबित ठेवू नये. नोंदणी केलेल्या कोणताही शेतकरी या प्रक्रियेपासून आणि विमा रक्कम मिळवण्यापासून वंचित राहणार नाही, असे स्पष्ट करून मंत्री श्री सत्तार यांनी विमा कंपन्यानिही याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले
जे शेतकरी विमा मिळवण्या पासून वंचित आहेत. अशा शेतकरी बांधवांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती पिक विमा कंपनीच्या माध्यमातून तात्काळ रक्कम जमा केली जाऊ शकते.