PM Kisan Installment : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील (PM Kisan Yojana) चालू आर्थिक वर्षांचा अखेरचा हप्ता कधी जमा होणार, याबाबत बरीच चर्चा होती. मात्र, आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. सरकारमधील सूत्रांच्या माहितीनुसार, हा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
हे वाचा : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला ‘लॉक’ ?
या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना प्रत्येक आर्थिक वर्षात ६ हजार रुपये देण्यात येतात. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होते. नेहमी जानेवारी महिन्यातच हप्ता जमा होतो. मात्र, यावेळी तसे न झाल्यामुळे बराच संभ्रम निर्माण झाला होता. आता तो दूर होत असताना दिसत आहे.
PM Kisan Installment
हीच तारीख का ?
शेतकरी सन्मान योजनेला 24 फेब्रुवारीला 4 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे याच दिवसाची निवड करण्यात आली आहे. तारखेबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, सूत्रांनी तसे संकेत दिले आहेत.