PM Kisan Money : 11 लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 1,554 कोटी रुपये.

PM Kisan Money : पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दर वर्षी सहा हजार रुपये जमा होतात. मात्र एप्रिल 2019 पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत सुमारे 11 लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याची बाब समोर आली आहे. ही रक्कम थोडीथोडकी नसून 1,554 कोटी रुपये इतकी आहे. त्यातील केवळ 92.74 कोटी रुपये पुन्हा वसूल करण्यात सरकारच्या कृषी विभागाला यश आले आहे.

हे वाचा : मुख्यमंत्री सौरकृषी योजनेसाठी 30 हजार कोटींची गुंतवणूक.

किसान सन्मान निधीअंतर्गत राज्यातील सुमारे 1 कोटी 10 लाख 59 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. या योजनेच्या निकषानुसार आयकर भरणारी व्यक्ती, आमदार, खासदार, वकील डॉक्टर आदी या योजनेसाठी पात्र ठरत नाहीत. मात्र अशा अपात्र शेतकयांच्या खात्यावर पैसें जमा झालेले आहेत.

PM Kisan Money

👇 👇 👇

हे शेतकरी अपात्र
इथे क्लिक करून पहा

वसुलीचे काम हाती
  • अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याच बाब कृषी विभागाच्या निदर्शनास आली आहे. आता खात्यावर गेलेली ही रक्कम पुन्हा वसूल करण्याचे काम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.

Leave a Comment