पी एम किसान (pm kisan yojana documents) लाभधारकांना आपल्या १३ व्या हप्त्याचे पैसे अडकू नये असे वाटत असेल तर तुम्ही नवीन नियम नीट पाळला पाहिजे. आता शेतकऱ्यांना नोंदणीसाठी शिधापत्रिकेची (रेशन कार्ड) ची सॉफ्ट कॉपी द्यावी लागणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.
आता हार्ड कॉपी देण्याची गरज राहिलेली नाही व पोर्टल वरती सॉफ्ट कॉपीची पीडीएफ अपलोड केली जाणार आहे. यासोबतच केवायसी करणे देखील आवश्यक आहे. या दोन कागदपत्राशिवाय (pm kisan yojana documents) तुम्हाला 13 वा हप्ता मिळणार नाही.
यापूर्वी प्रक्रिया होती आतापर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी खतावणी, आधार कार्ड, बँक पासबुक व घोषणापत्र याची हार्ड कॉपी जमा करावी लागत होती. आता ही प्रक्रिया बंद झाली असून फक्त सॉफ्ट कॉपी जमा करायचे आहे.
यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून पारदर्शकता ही वाढणार आहे. बरेचसे शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचे पैसे देखील अद्याप मिळालेले नाहीत.
हे कागदपत्रे देखील आवश्यक :
सरकारकडून पी एम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यासाठी आणखी काही कागदपत्रे आवश्यक केली आहेत. शेतकऱ्यांसाठी आधार कार्ड असणे आवश्यक आधार कार्ड नसलेले शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही यावेळी हप्त्याचे पैसे न मिळालेल्या बहुतांश शेतकऱ्यांची कागदपत्रे अपूर्ण असून यांची खतावणी अद्यावत करण्यास सांगितले आहे.