PM Kusum Solar : महावितरणकडून वीजपुरवठा होऊ न शकणाऱ्या भागात महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या (मेडा) प्रधानमंत्री कुसुम योजनेतून शेतकऱ्यांना सौर पंपांचे (Solar Pump) वाटप करण्यात येते. या योजनेसाठी एक लाख पंपांच्या उद्दिष्टापैकी अजूनही सुमारे 25 हजार पंपांचे वाटप झालेले नाही. त्यासाठी बुधवारपासून (दि. 17) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
हे वाचा : खताच्या दरात दिलासा कधी ?
पुढील एक लाख पंपांसाठीची (Solar Pump Yojana) प्रक्रिया सुरु झाली आहे. लवकरच त्यासाठीही अर्ज मागविण्यात येतील. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतून मागणी कमी आहे. तर औरंगाबाद विभागासाठी उद्दिष्टापेक्षा जास्त अर्ज आले आहेत. जिल्ह्यांच्या उद्दिष्टानुसार या पंपांचे वाटप होईल. जेथून अर्ज कमी येतील अशा शिल्लक पंपांचे वाटप इतर जिल्ह्यांमध्ये करण्यात येईल.
PM Kusum Solar

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अर्जांची छाननी
- आतापर्यंत राज्यभरातून 1 लाख 18 हजार 898 जणांनी यासाठी अर्ज केले होते. त्यातील 99 हजार 331 अर्जाची छाननी करण्यात आली.
- पात्र अर्जदारांपैकी 70 हजार 529 जणांनी स्वाहिश्शाची रक्कम भरली आहे.
- तर 69 हजार 669 अर्जदारांनी सौरपंप पुरवठादाराची निवड केली आहे. त्यानंतर 56 हजार शेतकऱ्यांच्या शेतावर पंप बसविण्यात आले आहेत.



Mazi nursery aahe mala 5 hp pump sati pahije
To save nature , electricity i want solar energy so
I love solar power