PMFBY : एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम.

PMFBY

(PMFBY) : नुकसानग्रस्त चार लाख शेतकऱ्यांपैकी एक लाख शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम (Crop Insurance) खात्यात जमा झाली आहे. पीक विम्याची रक्कम (Crop Insurance Compensation) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. उशिरा का होईना पीकविमा मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे.

येथे क्लिक करून पिक विमा यादी पहा

पीकविम्याचा हप्ता भरल्यानंतरही शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही, असा काही वर्षातील अनुभव आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत पीकविमा (PMFBY) योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील सातत्याने कमी होत आहे. यंदा महाराष्ट्रात जवळपास 15 लाख 30 हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग नोंदविला आहे.

पीकविमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची संख्या कमी असतानाच जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी भरपाई मिळावी, याकरिता पूर्वसूचना देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या त्यापेक्षाही कमी आहे. कृषी विभागाने चार लाख शेतकऱ्यांपैकी केवळ दोन लाख शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण केलेले आहेत. त्यातील १ लाख ५ हजार शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करण्यात आला आहे.

येथे क्लिक करून पिक विमा यादी पहा

पीकविमा कंपनीने ८३ कोटी रुपये जिल्ह्यासाठी मंजूर केले आहेत. संबंधित कंपनीला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत आहे. शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला असला तरी अजूनही अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीकविमा मंजूर झाला होता. तो शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी आमचा पाठपुरावा सुरूच आहे. पहिल्या टप्प्यातील मदत वितरणास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होत आहे.

Leave a Comment