Pocra Scheme : पोकरा योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर.

Pocra Scheme : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (Nanaji Deshmukh Agriculture Sanjeevani Project) शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. या प्रकल्पातून शेतकऱ्यांना स्प्रिंकलर व ठिबक संचाचा लाभ मिळाल्याने या शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासोबत नगदी पिकांचीही लागवड केली आहे.

हे वाचा : रेशन किती मिळाले ? आता मोबाइलवर कळणार.

गेल्या मार्च 2018 मध्ये ‘पोकरा’ प्रकल्प राज्यातील खारपण पट्टा, आत्महत्याग्रस्त व अवर्षणग्रस्त अशा 14 जिल्ह्यांत सुरू करण्यात आला. या प्रकल्पातून शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभासोबत, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचतगटांसाठी सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे. त्यात पाच हेक्टरपर्यंच्या शेतकऱ्यांना नोंदणी करता येते.

Pocra Scheme

या योजनांचा लाभ मिळणार

योजनेनिहाय लाभार्थ्यांची संख्या
  • कुक्कुटपालन लाभार्थी एक, नाडेप कंपोस्ट 84, ठिबक संच 931, अवजारे 263, शेततळे 46, बीबीएफ 1,472, फळबाग 321, मत्सशेती-दोन, पॉलिहाऊस पाच, रिचार्ज विहिरी पाच, बीजोत्पादन 1,060, रेशीम शेती 26, शेडनेट 16, स्प्रिंकलर 6,372, पंप 636, विहिरी 150, पाइप्स 613, खारपान शेती 307, इतर 38अशाप्रमाणे एकूण 12 हजार 540 शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे.

Leave a Comment