POCRA Subsidy : शेतकरी, गाव, वाड्या, वस्त्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय्य घेऊन मराठवाड्यातील अडीच हजारावर गावात राबविल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात ‘पोक्रा’ प्रकल्पातून एप्रिल अखेरपर्यंत 3 लाख 93 हजार शेतकऱ्यांना 1963कोटी 83 लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. प्रकल्पात सहभागी गावातील जवळपास 6 लाख 65 हजार 462 शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून नोंदणी केली आहे.
हे वाचा : फळबाग लागवड योजना, अनुदानासह शेकऱ्यांना मिळणारं मोफत रोपे.
‘पोकरा’साठी मराठवाड्यातील 2627 गावे निवडली गेली. या गावांमधून जवळपास 6 लाख 65 हजार 462 शेतकऱ्यांनी प्रकल्पांतर्गत नोंदणी केली. या शेतकऱ्यांकडून जवळपास 16 लाख 13 हजार 532 अर्ज प्रकल्पांतर्गत विविध घटकांसाठी प्राप्त झाले.
POCRA Subsidy
त्यापैकी 3 लाख 93 हजार शेतकऱ्यांना अवजारे बॅंक, फळबाग व इतर विविध योजनांसाठी जवळपास 1963 कोटी 83 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ही माहिती कृषी विभागाच्या मराठवाडास्तरीय आढावा बैठकीतून कळाली.