Post Office Saving Schemes : बचत करा, पोस्टात ठेवा, ठेवींवर व्याजदर जादा.

Post Office Saving Schemes : तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर खात्रीशीर ठिकाण म्हणजे पोस्ट कार्यालय आहे. त्यांनी आता नवीन आर्थिक वर्षात ठेवीवर सर्वाधिक 8.2 टक्के व्याज दिले आहे. त्यामुळे या योजनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, विविध योजनांवरील व्याजदरही वाढविण्यात आला आहे. जादा व्याज हवे असेल तर पोस्टात गुंतवणूक करायला हवी.

हे वाचा : ‘आरटीई’ प्रवेशाला मुहूर्त लागेना , पालकांचा जीव टांगणीला.

नव्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीयीकृत बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदर कमी केला. यापूर्वी 7.25 टक्के दर होता तो आता 7.10 टक्के केला आहे, तसेच एक वर्षाच्या मुदत ठेवीसाठीचा व्याजदर 7 टक्क्यांवरून कमी करून 6.75 टक्के केला आहे. एकीकडे राष्ट्रीयीकृत बँका आपले व्याजदर कमी करत आहेत, तर दुसरीकडे टपाल विभागाकडून त्यांच्या ठेवींवर व्याजदर वाढविले आहेत.

Post Office Saving Schemes

👇 👇 👇 👇

पोस्टामध्ये व्याजदर किती ?
इथे क्लिक करून पहा

ज्येष्ठ नागरिकांसाठीची सिनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीममध्ये पूर्वी 15 लाख रुपयांची गुंतवणुकीची मर्यादा होती, ती आता 30 लाख रुपये केली आहे. या योजनेवर सर्वाधिक व्याजदरही दिला आहे. पूर्वी 8 टक्के व्याज होते ते आता 8.2 केले आहे. त्यामुळे ज्येष्ठांना याचा फायदा मिळणार आहे

Leave a Comment