PM Awas Yojana : राज्यात सन 2016-17 पासून प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (Pradhan Mantri Awas Yojana Gramin List) ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत घरकुल बांधकामाकरिता साधारण क्षेत्रात रू.1.20 लक्ष व नक्षलग्रस्त भागाकरिता रू.1.30 लक्ष प्रति लाभार्थी अर्थसाहाय्य दिले जाते.
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण, 2011 मधील माहिती लाभार्थ्यांच्या निवडीकरिता वापरण्यात येत आहे. तसेच स्वच्छ भारत अभियानातंर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर आता घरकुल योजनेची यादी (PM Awas Yojana List) जाहीर करण्यात आली आहे, ती डाऊनलोड कशी करावी ? या बद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
PM Awas Yojana List
घरकुल यादी मोबाईल मध्ये पाहण्यासाठी खालील माहिती व्यवस्थितरित्या वाचा आणि घरकुल योजनेची यादी तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून पहा.
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची अधिकृत वेबसाईट जा. जी आहे – https://pmayg.nic.in/
- आता तुम्हाला सर्वात वरील टॅब मध्ये तिसर्या क्रमांकावर “Awaassoft” ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून ड्रॉपडाऊन मेनू मधून “Report” या पर्यायावर क्लिक करावे.
- “Report” या पर्यायावर क्लिक केल्यानंतर Reports चे नवीन पेज ओपन होईल. यामधून तुम्हाला आता H. Social Audit Reports हा पर्याय पाहायचा आहे. त्याखाली “Beneficiary details for verification” या पर्यायावर क्लिक करावे.
- क्लिक केल्यानंतर Rural Housing Report हा पेज दिसेल. यामधून डाव्या बाजूला तुम्हाला आता तुमचं तपशील टाकून यादी पाहता येणार आहे.
- तपशील मध्ये राज्य, जिल्हा, तालुका, गाव, वर्ष आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा पर्याय निवडून घ्यावा.
- त्यानंतर सर्व तपशील निवडल्यानंतर Captcha Code मध्ये गणितीय प्रक्रिया दिलेली असेल, ती सोडवून Submit या पर्यायावर क्लिक करावे.
- Submit केल्यावर आता तुम्हाला त्या गावाची संपूर्ण घरकुल यादी दिसेल. ही यादी तुम्ही PDF स्वरुपात मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.