Rabbi Pik Vima
पंतप्रधान पीक विमा (Rabbi Pik Vima) योजना रब्बी हंगाम (Rabi season) 2021 – 22मध्ये गहू, हरभरा व रब्बी ज्वारीसाठी 46 हजार 159 विमाधारकांना 18 कोटी 78 लाखांचा विमा मंजूर झाला आहे. या योजनेत 76 हजार 507 शेतकऱ्यांनी दोन कोटी 87 लाखांसह केंद्र व राज्य सरकारचा एकूण 56 कोटी 15 लाखांचा विमा हप्ता भरला होता. हा विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती कृषी विभागाच्या (Agriculture Department) सूत्राने दिली.
हे वाचा : पिकांचे आजचे बाजार भाव.
जिल्ह्यात रब्बी हंगाम (Rabbi Pik Vima) 2021 – 2022 मध्ये पंतप्रधान पीक विमा योजना इफ्को टोकीयो जनरल विमा कंपनीकडून गहू, रब्बी ज्वारी व हरभरा या पिकासाठी राबविण्यात आली होती. ही विमा योजना जिल्ह्यातील सर्वच सोळा तालुक्यांत राबविण्यात आली होती. यात जिल्ह्यातील 76 हजार 507 अर्जदार शेतकऱ्यांनी 55 हजार 369 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते.
यात 191 कोटी पाच लाख विमा निर्धारित केली होती. गहू, हरभरा व रब्बी ज्वारीसाठी शेतकऱ्यांनी दोन कोटी 87 लाखांचा विमा हप्ता भरला होता. तर राज्य सरकारने 26 कोटी 64 लाख तर केंद्राने 26 कोटी 64 असा एकूण 56 कोटी 15 लाखांचा विमा हप्ता कंपनीकडे जमा करण्यात आला होता.
कोणत्या जिल्ह्याला किती विमा मंजूर
दरम्यान, गहू, रब्बी ज्वारी व हरभरा या पिकाला वातावरणाचा फटका बसल्याने 16 तालुक्यांपेकी धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, मुदखेड, मुखेड व नायगाव या तालुक्यांतील 46 हजार 159 शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला आहे. यात 34 हजार 358 हेक्टरवरिल पिकांच्या भरपाईपोटी 18 कोटी 78 लाख 96 हजारांचा विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.