Today Rain Forecast : राज्याच्या गेल्या काही दिवसांपासून विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. काही ठिकाणी जोरदार गारपिटीनेही (Hailstorm) तडाखा दिला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज (Rain Forecast) आहे. तर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
हे वाचा : या दिवशी पीकविमा जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात.
पावसाची हजेरी ढगाळ वातावरण यामुळे राज्यातील कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये वर्धा येथे राज्यतील उच्चांकी 34.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान पुन्हा 30 अंशांच्या वर गेले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 30 ते 35 अंशांच्या दरम्यान होते.
Today Rain Forecast
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
दक्षिण कर्नाटकपासून झारखंड पर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राजस्थानपासून उत्तर प्रदेश समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा, तसेच ईशान्य अरबी समुद्रापासून राजस्थानपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत हवेचा कूमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.