Rain Prediction : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस पुढील पाच दिवस सुरूच राहण्याचे संकेत आहेत. राज्याच्या तापमानातही (Temperature) चढ-उतार सुरूच असून, उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा (Rain Forecast) इशारा हवामान विभागाने (Weather Department) दिला आहे.
हे वाचा : पीक कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रं.
राज्यावर वादळी पावसाचे सावट असले तरी कमाल तापमानात वाढ होत आहे. तापमान 37 अंशांपार गेलेल्या ठिकाणी उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, उकाड्यातही मोठी वाढ झाली आहे. सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी 39.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव येथे तापमान 39 अंशावर पोचले होते. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान वाढून 34 ते 37 अंशांच्या दरम्यान होते.
Rain Prediction
👇 👇 👇
वादळी पावसाचा इशारा
आग्नेय अरबी समुद्रामध्ये समुद्र सपाटीपासून 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.