Rain Weather App : स्थानिक हवामानाच्या सद्य:स्थितीची माहिती आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाचा (IMD) अधिकृत हवामान अंदाज आता ‘मौसम’ या मोबाइल अँप्सवर सहज मिळतो. दोन वर्षांपूर्वी हे अँप्स तयार करण्यात आले अहे. ढगांच्या गडगडाटासह वीज कोसळण्याची पूर्वसूचना यासह अवकाळी पावसाचाही इशारा या अँप्सवर मिळतो. त्यामुळे हे अँप्स शेतकऱ्यांसाठी जास्त उपयुक्त ठरणारे आहे.
हे वाचा : पीक कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रं.
अँप्स डाउनलोड होताच मोबाइल स्क्रीनवर आपल्या शहराचे कमाल आणि किमान तापमान दिसते तसेच दैनंदिन सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्ताच्या वेळाही समजतात. हवामान खात्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले राष्ट्रीय बुलेटिनदेखील या अँप्सवर सहजरीत्या वाचायला मिळते. चक्रीवादळाचीही माहिती या अँप्सद्वारे लक्षात येते.
Rain Weather App
👇 👇 👇
ॲप कसे डाउनलोड करावे ?
भारतातील 200 शहरांचा समावेश
- मौसम या स्वतंत्र अँप्सद्वारे देशातील नागरिकांना हवामानाची अद्ययावत माहिती, हवामान अंदाज आणि तीव्र हवामानाच्या घटनांचे इशारे हवामान विभागाकडून उपलब्ध करून दिले जात आहेत.
- या मौसम ॲप्लिकेशनद्वारे देशभरातील तब्बल 200 हून अधिक शहरांबाबतची माहिती नागरिकांना मिळते.
I will like a weather information
Thanks for best information