Ration Card : राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये 37 लाख रेशन कार्ड धारकांना धान्याऐवजी रोख पैसे देण्याचा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला. त्यानुसार प्रतिमहिना प्रतिलाभार्थी 150 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येतील.
हे वाचा : पीएम किसान योजनेचे 2,000 रु शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले.
जानेवारी 2023 पासून योजनेची अंमलबजावणी होणार असून, त्यासाठी 59 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL (केशरी) रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता प्रत्येक वर्षी आधारभूत किमतीत वाढ झाल्यास रोख रकमेत देखील वाढ होणार आहे.
Ration Card

या जिल्ह्यांत होणार सुरु
इथे क्लिक करून पाह
- या योजनेत 24 जुलै 2015 च्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांना (Ration Card) ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत समाविष्ट करण्यासाठी केशरी APL शेतकरी कुटुंबाला ऑफलाइन, ऑनलाइन स्वरुपात अर्ज भरावा लागणार आहे.
- हि माहिती तालुकास्तरीय डाटा एन्ट्री (Data entry) ऑपरेटरच्या साह्याने भरली जाणार आहे. अर्जाची छाननी तहसीलदार करतील. या योजनेत गाव सोडून गेलेले लाभार्थी वगळण्यात येणार आहे. यानंतरच यादी जिल्हा पुरवठा अधिकायांकडे पाठवण्यात येणार आहे.
- पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याची प्रक्रिया जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणार आहे. कुटुंबप्रुमख महिला असल्यास अशा कार्डमध्ये महिलाप्रमुखाला बँक खाते काढावे लागणार आहे.