Ration Card Update : रेशन किती मिळाले ? आता मोबाइलवर कळणार.

Ration Card Update : रेशन कार्डवरील धान्य तुम्हाला ठरलेल्या मापात मिळतेय, याची खात्री आहे का तुम्हाला ? कदाचित नसेलच. आता तुमच्यासाठी ठरलेल्या धान्याचा कोटा आणि तुम्ही किती धान्य घेतले, याचा एसएमएस (SMS) तुम्हाला मिळणार आहे. याबाबतची चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारने सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे रेशन दुकानदारांकडून होणाऱ्या मापात पापाचे वाटेकरी कोण, हे कळू शकणार आहे.

हे वाचा : कांदा अनुदानासाठी अर्ज केला का ? इथे करा अर्ज.

परिणामी, ग्राहकांकडून होणाऱ्या तक्रारी कमी होतील, असा होरा सरकारी पातळीवर व्यक्त होत आहे. रेशन कार्डांना कुटुंबांतील सर्वच सदस्यांचे आधार जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. याच धर्तीवर या रेशन कार्डांना मोबाइल क्रमांक लिंक केले जाणार आहे. याबाबत ग्राहक पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांनी सर्व जिल्हा पुरवठा अधिकायांना हा निर्णय तातडीने लागू होणार आहे.

Ration Card Update

कोणाला किती धान्य मिळते ?

मोबाइल क्रमांक जोडण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था तयार करण्यात येत आहे. तसेच, ही सुविधा प्रत्येक रेशन दुकानदाराकडे द्यायची का, याबाबतही वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. सध्या तालुका स्तरावर ही सुविधा उपलब्ध आहे. गावातील धान्य वितरण समितीला धान्याचा कोटा आल्याचा एसएमएस मिळतो. त्याच धर्तीवर सर्वच ग्राहकांना असा एसएमएस देता येणार आहे.

Leave a Comment