Ration Scheme : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला ‘लॉक’ ?

Ration Scheme : देशातील 80 कोटी नागरिकांना खूश करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर मोफत धान्य योजनेची घोषणा केली होती. दुसरीकडे कोरोना काळात सुरू केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (Garib Kalyan Yojana) मुदतवाढ दिली नसल्याने ही योजना बंद केल्याचे मानले जाते आहे.

हे वाचा : पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार.

या योजनेतून प्रतिलाभार्थी 5 किलो धान्य मोफत दिले जात होते. आतापर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या (Pradhanmantri Garib Kalyan Yojana) लाभार्थ्यांना दोन्ही योजनांतून धान्य मिळत होते. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना बंद केल्याने सरकारचे एका योजनेतील धान्य वाचणार आहे.

Ration Scheme

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गरिबांना अन्नसुरक्षा देता यावी, यासाठी केंद्र सरकारने एप्रिल 2020 मध्ये ही योजना सुरू केली. डिसेंबर अखेर सरकारने या योजनेला सात वेळा मुदतवाढ दिली. एप्रिलमध्ये सहा महिन्यांसाठी तर सप्टेंबरमध्ये तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली.

मात्र, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटी नागरिकांना 2023 या वर्षात मोफत धान्य देण्याची योजना जाहीर केली. ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देण्यात येणार असेही घोषित केले.

Ration Yojana

Leave a Comment